मुंबईत साडेपाच लाख नागरिकांची कोरोनाच्या कचाट्यातून सुटका

Corona
Corona

मुंबई : देशासह महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona  विषाणूने उद्रेक केला असतानाच मुंबईकरांसाठी काही अंशी दिलासादायक बाब कोरोना पार्श्वभूमीवर समोर येत आहे.  मुंबईत Mumbai कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असून गेल्या पाच - सहा दिवसांत १ लाख ५८ हजार घरे आणि ५ लाख ५४ हजार नागरिकांची कोरोनाच्या कचाट्यातून सुटका झाली आहे. दरम्यान, प्रतिबंधीत करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ३७३ ने घटली आहे.Five and a Half Lakh Mumbaikars Released From Corona

फेब्रुवारी महिन्यात मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने महापालिकेसमोर कोरोना संकटाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोविडने आक्रमक रुप धारण केले होते.

हे देखील पहा -

त्यानंतर कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले. महापालिका प्रशासनाने नियमांच्या कडक अंमलबजावणी आणि प्रभावी उपाययोजनांच्या आधारे कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आणल्याचे दिसून येत आहे. Five and a Half Lakh Mumbaikars Released From Corona

कोविडचा Covid संसर्ग कमी होऊ लागल्यावर पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या १ हजार १०९ वरुन ७२८ वर खाली आहे. तर प्रतिबंधीत वस्त्यांची संख्या ११५ वरुन १०२ आली आहे. तर सील मजल्यांची संख्या १० हजार ६८६ वरुन ९ हजार ६९ वर आली आहे.

Edited By - Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com