आळंदीमध्ये महिला पोलिसांनी दाखवली आईची माया..

mother death
mother death

पुणे : दोन दिवसांपासून बंद घरातून वास येत होता, म्हणून शेजाऱ्यांनी पोलिसांना Police खबर दिली. घटनास्थळी पोचल्यावर मृत Dead महिला आणि तिच्यासोबत दीड  वर्षाचे भूकेने व्याकूळ बाळ पाहिल्याचे चित्र पोलिसांना बघायला मिळाले. ही विदारक परिस्थिती पाहून महिला पोलिसांचे हृदय हेलावून गेले. एकिकडे मयत आईला पुढील तपासासाठी नेण्याची पोलिसांची लगबग तर दुसरीकडे दोन दिवस अन्नपाण्यावाचून निपचित पडलेल्या बाळाला मायेने दुध बिस्कीट चारत दोन महिला पोलिसांनीच मावशी बनून आईची माया देत भूक भागवली. Female police feed with love to two days of hungry baby after mother died in alandi

सरस्वती राजेशकुमार (वय २९, उत्तरप्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना भोसरीतील Bhosari फुगेवस्तीमध्ये सोमवारी घडली आहे. उत्तरप्रदेशमधून Uttar Pradesh कामधंद्यासाठी हे कुटूंब आले होते. पण लॉकडाऊनमुळे Lockdown सरस्वती राजेशकुमार यांचा पती गेल्या महिनाभरापासून गावी गेला होता. मात्र काल अचानक पोलिसांना एका महिलेने बंद घरात कुजल्याचा वास येत असल्याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोचले तर दरवाजा आतून बंद होता. मग खिडकीमधून गजाच्या साहाय्याने दरवाजाची कडी काढली.

घरामध्ये सरस्वती राजेशकुमार या मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. तर त्यांच्या शेजारीच दीड वर्षांचा मुलगा निपचित पडून होता. मुलगा अन्नपाण्यावाचून व्याकूळ होता. पोलिसांनी शेजारील महिलेला सांभाळ करण्यास सांगितले. पण कोणी जवळ घ्यायला तयार होईना. अखेर घटनास्थळी तपासासाठी आलेले पोलिस उपनिरिक्षक बी.एस. शिखरे यांनी दिघी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांना मुलाचा सांभाळ करण्यासाठी बोलावून  घेतले. दोघींनीही बाळाला दुध बिस्कीट खाऊ घातले आणि नंतर रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. Female police feed with love to two days of hungry baby after mother died in alandi

वडमुखवाडी Vadmukhwadi आणि दिघी येथील दोन रूग्णालयात बाळाचा उपचारासाठी नेण्यात आले होते. बाळाची कोरोना Corona चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यास दिघी येथील शिशुगृहात ठेवले आहे. तर मयत सरस्वती राजेश कुमार हिचा मृत्यू नेमका कशाने झाला यासाठी तिचे मृतदेह वायसीएम रूग्णालयात  पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण कळेल, तर बाळाच्या वडिलांना सदरची घटना पोलिसांनी कळवली असून ते उत्तरप्रदेशमधून बाळाला नेण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांनी बाळाबद्दल दाखवलेल्या मायेचे कौतुक सर्वत्र होत आहे. फुगेवस्ती येथील घटनास्थळी घराच्या बाजूलाच मांडी घालून दोघींनी बाळाला दुध बिस्कीट चारले. त्यामुळे बाळाला थोडे बळ मिळाले. आईचे छत्र हरविले, मात्र तात्पुरते का होईने महिला पोलिसांनी दिवसभर मावशी बनून बाळाला माया दिल्याने आजूबाजूचे रहिवाशी कौतुक करत होते.सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक बी.एस.शिखरे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com