अंबरनाथमध्ये लसीकरणावर भर देणार, २ लाख लसी खरेदी करण्याचा पालिकेचा निर्णय

baithak
baithak

उल्हासनगर -  अंबरनाथ Ambernath शहरात कोरोना Corona काहीसा नियंत्रणात आला असला, तेही आता लसीकरणावर Vaccination भर देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याच अनुषंगाने २ लाख लसी Vaccine खरेदी करण्याची प्रक्रिया अंबरनाथ पालिकेनं सुरू केली आहे. Emphasis on vaccination in Ambernath

अंबरनाथ शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दुसऱ्या लाटेत दिवसाला ५०० वर गेलेली रुग्णसंख्या सध्या दिवसाला २० ते २५ रुग्णांवर आली आहे. मात्र पुढे तिसऱ्या लाटेचीही भीती व्यक्त होत असून तिचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील पहा -

आज अंबरनाथ पालिकेत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी २ लाख लसी खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेऊन त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली. Emphasis on vaccination in Ambernath

तर ऑक्सिजन स्टोरेज वाढवणे, लहान मुलांसाठी ५० बेडच्या आयसीयूसह एकूण ३०० बेडचं विशेष हॉस्पिटल सुरू करणं असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी  डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील, नगरसेवक पंकज पाटील, निखिल वाळेकर, उत्तम आयवळे, अनिता आदक, अनंता कांबळे उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com