लाखो रुपयाचे औषधे टाकली जाळून; आरोग्य केंद्रही राहतंय रोजच बंद 

Drugs Found Burnt in Latur Hospital
Drugs Found Burnt in Latur Hospital

लातूर : जिल्ह्यातील Latur एका आरोग्य उपकेंद्रात Health Center अनेक औषधे गोळ्या जाळून टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. तर काही औषधे कचर्‍यात Garbage फेकण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. Drugs found Burnt in Latur District Rural Hospital

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामन्य व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी सरकारने Government कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाखों रुपयाचं पॅकेज देऊन ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी नियुक्त्या दिल्या आहे.मात्र आरोग्य विभागाची उदासिनता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनास्था आणि कर्मचाऱ्यांची चालढकल वृत्तीमुळे आजही ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. 

हे देखिल पहा

निलंगा तालुक्यातील अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत केळगाव प्राथमिक उपकेंद्र चालते परंतु कोरोनाच्या भयानक परिस्थिती मध्ये मागील दोन महिन्यापासून येथील आरोग्य केंद्राला टाळे असल्याने आरोग्य केंद्र कुलूप बंद आहे. परंतु, कोणता अधिकारीही ते फिरकला नाही. नागरिकांच्या प्राथमिक आजारांच्या समस्या ह्या दूर व्हावे यासाठी शासन स्तरावर लाखो रूपये खर्च करून औषध पुरवठा केला जात आहे. मात्र केळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे औषध गोळ्या कचऱ्यात फेकून देत असल्याचे उघडकीस आले आहे.

सध्या सर्वत्र संचारबंदी सुरू आहे गावांमध्ये जनजागृती करणे व औषध गोळ्यांचे प्राथमिक स्वरूपात वाटप करणे यासाठी आरोग्य केंद्राची शासनाने निर्मिती केली आहे. परंतु अशा महामारी च्या काळामध्ये मागील दोन महिन्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र केळगावला टाळे असल्यामुळे गावातील नागरिकांना उपचासाठी निलंगा येथे जावे लागत आहे. Drugs found Burnt in Latur District Rural Hospital

सध्या गावोगावी करोनाच्या भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेणारे अधिकारी नसेल तर ते आरोग्य केंद्र काय कामाचे? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे.आता या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? यावर लक्ष देवून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केळगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com