dhule chor
dhule chor

शेतकऱ्यांनी ठिबकच्या नळ्या चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

धुळे - पावसाळा सुरू होण्याआधी शेतकऱ्यांची शेतामध्ये ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवून कापूस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. परंतु धुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबकच्या नळ्या अज्ञात चोरटे चोरी करून पसार होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.चोरट्यांच्या या प्रकारामुळे शेतकरी मात्र पूर्णतः हैराण झाले आहेत.  Drip pipes theft  from farmers fields by unknown thieves

अशाच काही चोरट्यांना रात्रीच्यावेळी पाळत ठेवून धुळे तालुक्यातील नेर परिसरात शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला आहे. नेर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ठिबक नळ्या चोरणाऱ्या टोळीने उच्छाद मांडला होता.

हे देखील पहा -

या सर्व शेतकऱ्यांनी रात्रीचा पहारा देत असताना मध्यरात्री संशयास्पद वाहन आढळून आल्याने शेतकऱ्यांनी या वाहनास अडवून त्यांची विचारणा केली असता वाहनधारक व वाहनामध्ये बसलेल्या चोरट्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर ग्रामस्थांचा संशय बळावला व ग्रामस्थांनी या चौघांनाही चांगलाच चोप दिला आहे.  Drip pipes theft  from farmers fields by unknown thieves

त्यानंतर या चोरट्यांनी  ठिबक सिंचनच्या नळ्या चोरण्याच्या उद्देशाने आलो असल्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांना ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी जागून या टोळीच्या मुसक्या आवळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघावयास मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com