मुंबईत डॉक्टर घेऊन आलेत 'डॉक्टर तुमच्या दारी मोहीम'

doctor aplya dari
doctor aplya dari

मुंबई: कोरोना Corona विषाणूची दुसरी लाट Second Wave मुंबई Mumbai आणि महाराष्ट्रात पसरली आहे. रोज हजारोच्या संख्येत रुग्ण आढळत आहे. आरोग्य Health यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. याच काळात काही खासगी डॉक्टर देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. 'डॉक्टर तुमच्या दारी' Doctor Tumchya Dari अशी संकल्पना राबवत आहेत. असेच एक योगेश भालेराव Yogesh Bhalerao नावाचे युवा डॉक्टर, विक्रोळीच्या गल्ली बोळात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. Doctor Tumchya Dari Campaign for corona in Mumbai

राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संचारबंदी Curfew लागु केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही लोक छोट्या छोट्या कारणासाठी घराबाहेर पडून गर्दी करत आहे. त्यामुळे कोरोनाची चेन तोडणाऱ्या या ब्रेक द चेन  मोहिमेला आडकाठी येत आहे.

हे देखील पहा -

पूर्व उपनगरातील डॉ भालेराव यांनी लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी तसेच डोअर टू डोअर Door to door जाऊन लोकांना सेवा देण्यासाठी 'डॉक्टर तुमच्या दारी' ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये नागरिकांचे ऑक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन आणि टेम्परेचर Temperature तपासले जात आहे.

यामध्ये जे कुणी आजारी असतील त्यांना योग्य औषधे Medicines तसेच ज्यांचे ऑक्सिजन कमी आहे, किंवा काही रुग्ण कोरोना संसर्गित आढळल्यास त्यांना पालिका रुग्णालयात पुढील उपचाराकरता जाण्यासाठी सल्ला दिला जात आहे. १५ एप्रिल पासून आता पर्यंत ४२०० च्या वर रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे उपलब्ध करून दिले. गेल्या वर्षीही त्यांनी ५००० हजार पेक्षा अधिक रुग्णांची स्क्रिनिंग केली होती. आणि मोफत औषधे देखील दिले होते. Doctor Tumchya Dari Campaign for corona in Mumbai

कोरोनाच्या या संक्रमण काळात काही लोक जनतेला लुटत असल्याच पाहायला मिळते. तर काही जण मात्र आपली सामाजिक जबाबदारी ओळखून गोरगरिबांची सेवा करत समाजापुढे आदर्श निर्माण करत आहे.

Edited By- Sanika  Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com