तुम्ही एकाच ठिकाणी अनेक वर्षे नोकरी करताय का?

तुम्ही एकाच ठिकाणी अनेक वर्षे नोकरी करताय का?

नवी दिल्ली : जर आपण संपूर्ण करिअरमध्ये एकाच कंपनीसाठी काम करत असाल आणि तसे काम करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुम्ही स्वत:ला "आउटडेटेड' म्हणजेच जुन्या पिढीचे समजा. ही बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. एकाच ठिकाणी आयुष्यभर काम करणारी मंडळी ही जुन्या जमान्यातील आहेत, असे देशातील 75 टक्के भारतीयांना वाटते. 

पिअर्सन ग्लोबल सर्वेक्षणात एक हजार भारतीय नागरिकांसमवेत 19 देशांतील 16 ते 70 वयोगटातील 11 हजार नागरिकांनी यात सहभाग घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे झाले आहे आणि त्याचबरोबर मनोरंजनाचे साधनही उपलब्ध झाले आहे, असे 78 टक्के भारतीयांना वाटते. वयाच्या 58 व्या वर्षी होणारी पारंपरिक निवृत्तीदेखील जुन्या जमान्यातील प्रथा असल्याचे 75 टक्के भारतीयांना वाटते. त्याचवेळी 25 टक्के भारतीयांनी सेवानिवृत्तीनंतर आवडीचे करिअर निवडण्यास प्राधान्य दिले आहे. ज्या क्षेत्रात पदवी, पदविका किंवा उच्चशिक्षण घेतले आहे, त्याच क्षेत्रातील करिअर निवडणाऱ्या भारतीयांचे प्रमाण 84 टक्के आहे, तर 31 टक्के भारतीयांनी काळानुरूप करिअरचा मार्ग बदलला आहे.
औपचारिक शिक्षण चांगले असले तरी ते गरजेचे नसल्याचे 22 टक्के भारतीयांना वाटते, तर 22 टक्के भारतीयांच्या मते औपचारिक शिक्षणाला पूर्वीसारखे आता महत्त्व राहिले नाही. कारण, या शिक्षणाशिवाय यशस्वी होता येते, असे या गटातील नागरिकांचे म्हणणे आहे. देशातील शिक्षण व्यवस्था नव्या पिढीला साजेशी असल्याचे 59 टक्के भारतीयांचे मत आहे. 
निवृत्तीनंतर आवडीचे काम किंवा पार्टटाइम सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार सेवानिवृत्तीनंतर 25 टक्के नागरिक स्वत:चा व्यवसाय अन्य 25 टक्के भारतीय निवृत्तीनंतर आपल्या आवडीचे काम करण्यास उत्सुक आहेत, तर 15 टक्के नागरिकांना अर्धवेळ काम करण्याची तयारी आहे. नोकरीसाठी आणखी शिकण्याची गरज 76 टक्के नागरिकांना वाटते. त्याचबरोबर 78 टक्के नागरिकांना कौशल्य विकास करण्याची गरज वाटते. 

Web Title: Do you work for many years in one place?


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com