धुळ्यात चार केंद्रांवर गरजू घेत आहेत मोफत शिवभोजन थाळीचा लाभ

shivbhojan Thali
shivbhojan Thali

धुळे - कोरोनाची Corona साथ रोखण्यासाठी राज्य State Government सरकारने लॉकडाऊन lockdown लावले आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार, व्यवसाय बंद झाले असून हातावर पोट असणाऱ्यांचे हाल कठीण झाले आहे. अशा स्थितीत गरीब, मजुरांनवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकार तर्फे शिवभोजन shivbhojan थाळी योजनेतून जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. In Dhule Four centers serving Shivbhojan Thali to Needy

धुळ्यात dhule सध्या चार केंद्रांवर मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत असून याचा अनेक गरजू लोक लाभ घेत आहेत. राज्य  सरकारने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावला असून शिवभोजन थाळी ही 30 एप्रिल पर्यंत मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात धुळे शहरातील बस स्टैंड समोर शिवभोजन योजनेतून दररोज गरजू गरीबांना फुड पॅकेट food packet स्वरुपात जेवण वाटप केले जात आहे. 

शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने गरीब व गरजू शिवभोजन केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावून उभे असल्याचे बघायला मिळत आहे. धुळ्यात शिवभोजन थाळी मुळे गरीब व गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com