इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा धुळे शहर पोलिसांकडून पर्दाफाश...

vaccion dhule
vaccion dhule

धुळे : कोरोना Corona बाधित रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या टॉसिलीझूमॅब Tocilizumab नावाच्या इंजेक्शनचा धुळ्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचे धुळे Dhule शहर पोलिसांना समजल्यानंतर काही संशयितांची नावे देखील पोलिसांच्या Police समोर आली होती. Dhule city police exposes Tocilizumab racket

या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी धुळे शहर पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून संशयितांशी संपर्क करून या इंजेक्शनची मागणी केली. औषधांचा काळाबाजार करणाऱ्या संशयितांनी तब्बल 40 हजार रुपये किंमत असलेले इंजेक्शन चढ्या दाराने विकण्याच्या हेतूने दीड लाख रुपये किमतीने इंजेक्शन Vaccine देण्याचे समोरील ग्राहकास कबूल केले.

हे देखील पहा -

अशा पद्धतीने शहर पोलिसांनी सापळा रचून औषधांचा काळाबाजार Blackmarket करणाऱ्या या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या संशयितांकडून काही प्रमाणात इंजेक्शनचा साठा देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. Dhule city police exposes Tocilizumab racket

औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दोघा नराधमांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना इंजेक्शनचा साठा कुठून मिळतो. तसेच या रॅकेटमध्ये Racket आणखी किती जण सामील आहेत. व आतापर्यंत किती लोकांना चढ्या दराने या टोळीने इंजेक्शन विकली आहेत याचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.

Edited By- Krushna Sathe
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com