'तेजस' विमानातून राजनाथ सिंहांचं उड्डाण

 'तेजस' विमानातून राजनाथ सिंहांचं उड्डाण

बेंगळुरू: भारताचे तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) पाकिस्तान आणि चीनच्या लढाऊ विमानांपेक्षा वरचढ ठरत आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात याआधीच तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. डीआरडीओच्या अॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं तेजसचे डिझाइन केले आहे. हिंदुस्तान अॅरोनॉटिकल लिमिटेडने (एचएएल) या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे.

शत्रूंना धूळ चारण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या 'तेजस' लढाऊ विमानातून आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं. तेजसमधून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षण मंत्री आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अन्य लढाऊ विमानांच्या तुलनेत तेजस वजनानं हलका आहे. त्याचं वजन साधारण ६५६० किलो आहे. ५० हजार फूट उंचावर उड्डाण करू शकतं. त्याचे पंख ८.२ मीटर रुंद आहेत. तर लांबी १३.२ मीटर आणि उंची ४.४ मीटर आहे. तेजसमध्ये निश्चित लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्याची क्षमता आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास हे लढाऊ विमान सक्षम आहे, असं एअर चीफ मार्शल धनोआ यांनी सांगितलं. 

Web Title: defence minister rajnath singh flies in light combat aircraft lca tejas in bengaluru
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com