इटलीतील मृतांची संख्या आणखी वाढली

इटलीतील मृतांची संख्या आणखी वाढली

रोम :  जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. इटलीतही या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना व्हायरसमुळे भारतात आत्तापर्यंत दोनजण दगावले आहेत. तसेच इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे आत्तापर्यंत 17 हजार 660 प्रकरणं समोर आली आहेत. इटलीच्या मिलान शहरात 200-250 भारतीय अडकले आहेत. या नागरिकांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात असून, त्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने त्यांना भारतात आणले जाणार आहे. 

आतापर्यंत मृतांची संख्या 

इटलीत 17, 660 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीतील तब्बल 250 जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे इटलीत आता मृतांचा आकडा 1266 झाला आहे. 

फ्रान्समध्ये 79 जणांचा मृत्यू

फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर मागील 24 तासांत 18 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 79 झाली आहे. 

भारतात दुसरा बळी

कोरोना व्हायरसमुळे देशात दुसरा बळी गेला आहे. राजधानी दिल्लीतील 68 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला.

अनेक शाळांना सुट्टी

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, हरियाना, ओडिशा, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांनीही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. 

भारतीयांना मायदेशी आणणार

मिलान शहरात असलेल्या भारतीयांना मायदेश आणण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान पाठविण्यात येणार आहे. 

WEB TITLE- The death toll in Italy has increased

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com