मुंबईतील क्रूझच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

मुंबईतील  क्रूझच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

मुंबई: देशी क्रूझ व्यवसायाला चालना देण्यासाठी भाऊचा धक्का येथे डोमेस्टिक टर्मिनल मागील वर्षी उभारण्यात आले. हे टर्मिनल सुरू झाल्यापासून क्रूझ पर्यटनास तेजी आली आहे. अनेक नव्या क्रूझ ऑपरेटर्सनी क्रूझ सेवा सुरू केली आहे. मागील वर्षी आंग्रीया या क्रूझने मुंबई-गोवा मार्गावर सेवा सुरू केली. सध्या एक दिवसाआड ही सेवा सुरू आहे. देशातील एकूणच क्रूझ पर्यटनाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईचा वाटा लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसते. देशाच्या क्रूझ व्यवसायात मुंबईचा वाटा निम्म्यापेक्षा जास्त वाढला आहे.

मुंबई बंदरात येणाऱ्या देशी तसेच आंतरराष्ट्रीय क्रूझच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, पुढील वर्षी मुंबईतील अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार झाल्यानंतर क्रूझ पर्यटनाच्या बाबतीत मुंबई या उद्योगाची राजधानी होईल. क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने गेल्या पाच वर्षांपासून पुढाकार घेतला आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय क्रूझ कंपन्यांनी पोर्ट ट्रस्टशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये (आतापर्यंत) ५८० क्रूझ पाच लाख ६८ हजार प्रवाशांना घेऊन आल्या.
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उभरणीनंतर सन २०२५पर्यंत एक हजार क्रूझ मुंबईत येतील व त्यातून १० लाख पर्यटक प्रवास करतील, असा पोर्ट ट्रस्टला विश्वास आहे. 

Web Tittle :: Cruise numbers in Mumbai increase day by day


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com