कडक निर्बंधांनंतरही मुंबई लोकलमध्ये गर्दी कायम... 

Mumbai Local Crowd
Mumbai Local Crowd

मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कडक निर्बंध काढण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनंतरही मुंबई लोकलमधील गर्दी कायम दिसत आहे. कल्याण-छत्रपती शिवाजी टर्मिनस (Kalyan-Chhatrapati Shivaji Terminus)मार्गासह चर्चगेट-विरार (Churchgate-Virar) आणि हार्बर मार्गावरील पनवेल (Panvel) लोकलमध्ये सुरक्षित वावराला हरताळ फासला जात आहे. Crowds remain in Mumbai locals despite strict restrictions  

परिणामी 'हेच का ते कडक निर्बंध?' असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 'सकाळी ८.४२ कल्याण-सीएसएमटी (CSMT) अर्धजलद लोकल (Local Train) मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, कडक निर्बंध लागू झाल्यानंतरही गर्दी कमी होत नाही. रेल्वे-राज्य सरकार प्रशासन असो वा रेल्वे पोलिस-रेल्वे सुरक्षा दल या सुरक्षा यंत्रणा यामध्ये कुणीही गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे रेल्वे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

रेल्वे प्रवासी भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नाराजी व्यक्त केली आहे. लोकलमध्ये उभ्याने प्रवास करणाऱ्यांचे फोटो अनेक जागरूक प्रवाशांनी काढले आहे. प्रवाशांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपसह, फेसबुक, ट्विटरवर हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील हे फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. Crowds remain in Mumbai locals despite strict restrictions 

Edited By - Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com