पश्चिम रेल्वे पालघरकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावली  

rail covid coach
rail covid coach

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सातत्याने कोविड रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता जाणवत असून रुग्णांना दाखल करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम रेल्वे पालघरकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.पालघर मध्ये विना वातानुकूलित २४ कोच मध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले असून यामध्ये २३ कोच कोविड रुग्णांसाठी असून एक कोच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे अशी  माहिती देण्यात आली आहे. covid Center was set up in Palghar railway station

यात २३ कोचमध्ये जवळपास ४१५ कोरोनाबाधित  रुग्णांच्या उपचाराची क्षमता आहे. सध्या या मधील पाच रेल्वे कोच मध्ये जवळपास ९० बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक डब्यात१८ बेड आहे. या १८  बेड  मध्ये दोन ऑक्सीजण बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे देखील पहा - 

सर्व डब्यांना कुलर लावण्यात आले असून वातानुकूलित करण्यात आले आहेत. या रेल्वे कोविड सेंटरच संपूर्ण व्यवस्थापन नगर परिषदेकडे सोपविण्यात आले असून रुग्णांना जेवण व इतर व्यवस्था मोफत देण्यात येणार आहे. 

या कोविड सेंटरच लोकार्पण आज पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ,खासदार राजेंद्र गावित,नगराध्यक्ष उज्वला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.जसजशी रुग्ण संख्या वाढेल तसतसा या सेंटरचा विस्तार करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.पालघर रेल्वे स्थानकात हे कोविड सेंटर तयार झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com