COVID-19 India: दिलासादायक! देशातील दैनंदिन रुग्णसंख्येतील घट कायम

corona update
corona update

देशातील दैनंदिन सक्रीय रूग्णसंख्या घटण्याचा कल कायम असल्याचे  दिसून येत  आहे. गेल्या 24 तासांत एकूण  रूग्णसंख्येत  1,14,216  ची घट नोंदविली गेली.  ही घात नोंदविण्यात आल्यानंतर आज देशातील सक्रीय रुग्णसंख्या 21,14,508  वर पोहचली आहे.  आता देशातील  उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 7.58 टक्के इतके सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण झाले आहे. (COVID-19 India: The decline in the daily number of patients in the country continues)

देशात  सलग तिसऱ्या दिवशी  2 लाखांहून कमी  नव्या  रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  तर  गेल्या 24 तासांत दैनंदिन 1,65,553  नवीन रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, उपचाराधीन रूग्णांच्या  तुलनेत देशात सलग  17 व्या  दिवशी कोरोनातून मुक्त होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  म्हणजेच मागील 24 तासांत 2,76,309 रूग्ण  बरे होऊन घरी गेले आहेत. तर नवीन रूणांच्या तुलनेत 1,10,756 अधिक रूग्ण बरे झाले आहेत. महामारीला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत  2,54,54,320 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर  गेल्या 24  तासांत 2,76,309 रुग्ण बरे झाले आहेत. ही आकडेवारी बघता, देशात बरे होण्याचा एकूण दर 91.25 टक्क्यावर पोहचला आहे.

सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम करतंय- नरेंद्र पाटील 
 
दरम्यान, मागील चोवीस तासात देशात एकूण 20,63,839 नमुने तपासण्यात आले असून आतापर्यंत देशात एकूण 34.31 कोटीनमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.   देशात  एकीकडे चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत  असली तरी  साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 9.36% इतका आहे. तथापि, आज सकाळी  7 वाजेपर्यंत मिलेल्या आकडेवारी नुसार,  एकूण 21,20,66,614. लसीचे डोस  30,07,831 देण्यात आले आहेत. तर मागील चोवीसतासांत 30.35 लाख (30,35,749) पेक्षा जास्त लसींचे डोस दिले आहेत.

Edited By : Anuradha Dhawade

हे देखील पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com