भिगवण येथे घडले माणुसकीचे दर्शन....

baby
baby

बारामती: कोरोणाच्या Corona काळात आजही लोक माणुसकी विसरले नाहीत. याचे उदाहरण आपल्याला इंदापूर Indapur तालुक्यातील भिगवण Bhigvan येथे पाहायला मिळाले आहे . बाळाचे आई वडील कोरोना पॉझिटिव्ह Positive आल्याने तीन महिन्याच्या बाळाचा सांभाळ करून कांचन पाचंगणे एक आदर्श निर्माण केला आहे . Couple Caring for a three month old baby whose mother father tested positive for covid

कोरोनाच्या संकटाच्या लढ्यात कोरोनावर मात करण्यासाठी औषधाबरोबर धीर देण्याचीही तेवढीच गरज असते. नाहीतर घाबरलेल्या परिस्थितीत औषधही काम करित नाही. असे अनेक प्रसंग या कोरोनाच्या काळात पहायला मिळाले आहेत.

हे देखील पहा -

कोरोना झाला आहे असे म्हटल कि, जवळ असलेला माणूस लांब जाऊन ऊभा रहातो. आणि हेच वास्तव आहे. मात्र इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे मोठे माणुसकीचे दर्शन घडले आहे. भिगवण येथील उंडाळे कुठूंबातील तीन सदस्य पाॅझीटीव्ह आले. उंडाळे यांना एक तिन महिन्याचे बाळ देखील आहे. बाळाच्या आईला एका कोविड सेंटरमध्ये तर वडीलांना एका कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. तर एक सदस्य घरीच विलगीकरण कक्षात ठेवला आहे. आता या तिन महिन्याच्या बाळाला कुठे ठेवायचं, कोणाच्या भरवश्यावर ठेवायचे ? हा प्रश्न उंडाळे कुठूंबाला पडला. Couple Caring for a three month old baby whose mother father tested positive for covid

अशा बिकट परस्थितीत मित्रच आला मित्राच्या मदतीला धावून.  उंडाळे याचे बाळ अवघे तिन महिन्याचे असून त्याला आवश्यकता होती मायेच्या उबेची आणि अंगावरच्या दुधाची. ती पुर्ण केली कांचन पाचंगणे यांनी. विशाल पाचंगणे आणि त्यांच्या परिवाराने या तीन महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करून समाजाला एक नवा आदर्श घालुन दिला आहे. याचे सर्वच स्थरातुन कौतुक होत आहे. 

Edited By- Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com