बीड जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी

बीड जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी

बीड: औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्यामुळं तेथील करोना मृतांचा आकडा ३२ वर पोहोचला आहे. बीडमध्ये करोनाला बळी पडलेली महिला ही नगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी होती. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे पाहुण्याकडे राहायला आली होती. तिच्यासोबत आणखी सहा जण होते. करोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. पैकी रविवारी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळं तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यातच तिचा मृत्यू झाला.औरंगाबादमध्ये आतापर्यंत १०२१ बाधित आढळून आले आहेत व ३१२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. औरंगाबाद शहरातील ६५ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयामध्ये रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. जिल्ह्यात करोना व्हायरसनं पहिला बळी घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना पॉझिटिव्ह महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. 
करोनाबाधित असल्याचे १३ मे रोजी प्राप्त झालेल्या खासगी प्रयोगशाळेच्या रिपोर्टवरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर १६ मे रोजी त्याला घाटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. घाटी रुग्णालयामध्ये दाखल करताना संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान प्रकृती खालावत गेली आणि दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया तसेच गंभीर श्वसन विकारामुळे अखेर त्याचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णाला मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचाही त्रास होता.  हा रुग्ण शहरातील मदनी चौकात वास्तव्यास होता. कोरडा खोकला, ताप अशा लक्षणांमुळे कटकट गेट परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  
 

WebTittle ::  Corona's first victim in Beed district


 

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com