देशभरात कोरोनामुळे 934 लोकांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 29,435 वर

देशभरात कोरोनामुळे 934 लोकांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 29,435 वर

देशभरात कोरोनामुळे 934 लोकांचा मृत्यू  झाला असून कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजार 435 वर पोहोचलाय. सध्या भारतात 21 हजार 632 रुग्णांवर उपचार सुरू असून  6869 जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलंय,  अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 8590 रुग्ण आढळले असून मृतांची संख्याही 369 इतकी झालीय. गुजरातमध्ये 3548 बाधित आढळले असून आतापर्यंत 162 जणांचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशात 2168 कोरोनाबाधित आहेत तर मृतांची संख्या 110 वर पोहोचली आहे. तर तेलंगणात 26, तामिळनाडूत 24, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये 20 जण दगावले आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कोरोनाच्या लढाईमध्ये भारतातील काही राज्यांना मोठं यश मिळालं आहे. देशातली तब्बल ९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश कोरोनामुक्त झाले आहेत. त्रिपुरा, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, नागालँड, सिक्कीम, दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप हे भाग कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील या भागात आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २६,९१७ एवढी झाली आहे. कोरोनामुळे ८२६ जणांना जीव गमवावा लागला आहे. जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचं आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण ३.१ टक्के आहे, तर जगात हे प्रमाण ७ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतामध्ये कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर पडलेल्यांचं प्रमाण २२ टक्के झालं आहे, हेदेखील इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com