कोरोना उपायांसाठी सिडकोने २५ कोटी रूपये द्यावेत: गणेश नाईक यांची मागणी

Ganesh Naik
Ganesh Naik

नवी मुंबई: नवी मुंबई Navi Mumbai महापालिका हददीत कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. "नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. आणि त्यावर श्रीमंत बनलेल्या सिडकोने CIDCO येथील कोरोना उपाययोजनांसाठी नवी मुंबई पालिकेला किमान २५ कोटी 25 रूपयांचा निधी तात्काळ सुपूर्द करावा" अशी मागणी आमदार गणेश नाईक Ganesh Naik यांनी केली आहे. CIDCO should provide Rs 25 crore to Navi Mumbai MC for corona measures

सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक संजय मुखर्जी यांना आमदार MLA नाईक यांनी पत्र वाठवून म्हटले आहे की, कोरोना काळात इतर महापालिका हद्दीमध्ये ज्या प्रमाणे सिडकोने आतापर्यंत भरघोस आर्थिक मदत दिली, त्याच धर्तीवर नवी मुंबई पालिकेलाही सहकार्याचा हात द्यावा. असे मत त्यांनी व्यतक केले आहे. सिडकोने आतापर्यंत मुंबई Mumbai महापालिकेसाठी मुलुंड Mulund येथे त्याचप्रमाणे ठाणे Thane आणि पनवेल Panvel महापालिकांसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड केंद्रे Covid centers उभारण्यासाठी आर्थिक मदत देवू केली आहे. मात्र ज्या भागातून सिडको मोठी झाली त्या नवी मुंबईकडे सिडकोने पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच ही मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन Agitation  करण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com