Children enjoying the pre monsoon rains by dropping paper boats
Children enjoying the pre monsoon rains by dropping paper boats

मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ; बच्चे कंपनी मात्र खुश

यवतमाळ: यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद येथे मान्सूनपूर्व पावसाने Pre monsoon rains अचानक हजेरी लावली. आजपासून काही प्रमाणात निर्बंध हटविण्यात आल्याने शहरात नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे अचानकपणे आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. Children enjoying the pre monsoon rains by dropping paper boats

या मान्सूनपूर्व पावसात सर्वत्र चित्र दिसून आले ते म्हणजे, तहसील कार्यालयातील कामांसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला मिळेल त्या शेडचा आडोसा घेऊन उभे राहावे लागले. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली तर ज्यांच्याकडे छत्री होती त्यांनी छत्रीचा उपयोग घेत पावसापासून बचाव केला.

परंतु यापलीकडे पावसामुळे घरापुढे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात चिमुकल्यांनी कागदी होड्या सोडत मान्सूनपूर्व पावसाचा आनंद लुटला आहे.पावसामुळे अनेक नाले तुडुंब भरले होते. सर्वत्र सखल भागात पाणी जमा झाल्याचे दिसून आले. 

उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे हवेत गारवा आल्याने काहीसा दिलासा मिळाला. मृग नक्षत्रावर पाऊस पडल्याने शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. किमान १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच शेतकऱयांनी पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने Agriculture department केले आहे .

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com