दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके राज्याच्या दौऱ्यावर येत असून, 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान विविध जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या केंद्रीय पथकातील तीन टीम दिल्लीहून औरंगाबाद येथे दाखल झाल्या आहेत. दुष्काळाच्याझळा  येत्या तीन दिवसात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील भागात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करतील. यापैकी एक पथक सहा डिसेंबर रोजी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहे. पाहणीनंतर या पथकाकडून सरकारला अहवाल सादर करण्यात येईल.

Web Title: Central team to tour drought affected Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com