80 लाख रेमिसेडिवीरच्या उत्पादनास केंद्रसरकारकडून  हिरवा कंदील 

Remdesivir
Remdesivir

नवी दिल्ली : देशभरात कोरोना Corona महामारीचा भयानक उद्रेक झालेला असताना, केंद्र सरकारने 'रेमिसेडिवीर' Remisedivir ची वाढती मागणी पूणर्ज्ञ करण्यासाठी या इंजेक्‍शनचे उत्पादन लक्षणीय रित्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता दरमहा 80 लाख रेमिसेडिवीर डोसचे उत्पादकरण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.Central Government give nod to produce Eighty lakh Remicidivir doses

त्याची किंमत प्रत्येकी 3500 पर्यंत घटवावी असेही निर्देश देशातील सातही औषधनिर्मिती Drug Manufacturing Companies कंपन्यांना देण्यात आले आहेत. या औषधाचा काळाबाजार करणारांना हुडकून कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन Harshavardhana यांनी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीजीसीआय)DGCI दिले आहेत. Green lantern from Central Government to produce 80 lakh Remicidivir doses

या औषधाच्या निर्यातीवर Export यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या 24 तासांत देशातील नवी कोरोना रूग्णसंख्या 2 लाखांच्या आसपास तर मृत्यूसंख्या 1 हजारंहून जास्त झाल्याने केंद्रीय आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

यामध्ये होरपळणाऱ्या उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब Uttar Pradesh, Gujarat, Madhya Pradesh, Punjab आदी बहुतांश राज्यांकडून रेमिसेडिवीरचा दुष्काळ पडल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. केंद्राने रेमिसेडिवीरबाबत हात मुद्दाम आखडता घेतल्याचा आरोप महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड व केरळ या राज्यांनी केला आहे. 

त्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने या इंजेक्‍शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन याचे उत्पादन व पुरवढा किमान दुपटीने वाढविण्याचे व किमती घटविण्याचे निर्देश दिले आहे. राज्यांची वाढती मागमी त्वरित पूर्ण व्हावी. यासाठी आणखी 6 कंपन्यांनाही याची निर्मिती करण्यास हिरवा कदील दाखविण्यात आला आहे.

सध्या देशात दरमहा 38 लाख 80 हजार रेमिसेडिवीर इंजेक्‍शनांचे उत्पादन होते. या महिन्याच्या अखेरपर्यंत काहीही करून हे प्रमाण 80 लाखांपर्यंत नेण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. देशभरात याची उपलब्धता करण्याची जबाबदारी नॅशनल फार्मासुटीकल प्रायसिंग अॅथॉरिटीवर  टाकण्यात आली आहे.Central Government give nod to produce Eighty lakh Remicidivir doses

या इंजेक्‍शनचा काळाबाजार होत असल्याच्याही मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. रेमिसेडिवीरचा तुटवडा भासत असल्याचे खुद्द आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले की मध्यंतरी कोरोनाचा कहर कमी झाल्याने याचे उत्पादन कमी करण्यात आले होते. तेव्हा दुसरी लाट येऊ शकते, याचीही काही शक्‍यता दिसत नव्हती.

मात्र आता परिस्थिती गंभीर झाल्याने रेमिसेडिवीरचे उत्पादन वाढविण्याचे व काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र देशात कोरोना लसीची कोणतीही कमतरता नाही व प्रत्येक राज्याला केंद्राने डोस दिले आहेत व देत आहे असा दावा डॉ. हर्षवर्धन यांनी पुन्हा केला आहे.

Edited By- Digambar Jadhav 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com