‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ 

‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ 

पुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले ‘क्यार’ चक्रीवादळ कोकण किनाऱ्याजवळ घोंगावत आहे. या वादळी प्रणालीमुळे किनाऱ्यालगत ताशी ६५ ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यांंच्या किनाऱ्यांवर अतिवृष्टीचा, तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी रत्नागिरीपासून ३६० किलोमीटर तर मुंबईपासून ४९० किलोमीटर नैऋत्येकडे, तर ओमानच्या सलालाहपासून १७५० किलोमीटर पूर्वेकडे अरबी समुद्रात ही प्रणाली होती. रविवारपर्यंत (ता. २७) ही प्रणाली ओमानकडे सकरत जाण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, कोकण, कर्नाटकच्या किनाऱ्यावरही ढग दाटून आले आहेत. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार होत असून, ‘ऑक्टोबर हीट’चा चटका नाहीसा झाला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते १० अंशांनी, कोकणात १ ते ५ अंशांनी, मराठवाड्यात १ ते ४ अंशांची घट झाली आहे. पश्चिम विदर्भात कमाल तापमानात २ ते ८ अंशांची घट असून, पूर्व विदर्भात मात्र तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

घोंगावत आहे. या वादळी प्रणालीमुळे किनाऱ्यालगत ताशी ६५ ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यांंच्या किनाऱ्यांवर अतिवृष्टीचा, तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी रत्नागिरीपासून ३६० किलोमीटर तर मुंबईपासून ४९० किलोमीटर नैऋत्येकडे, तर ओमानच्या सलालाहपासून १७५० किलोमीटर पूर्वेकडे अरबी समुद्रात ही प्रणाली होती. रविवारपर्यंत (ता. २७) ही प्रणाली ओमानकडे सकरत जाण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, कोकण, कर्नाटकच्या किनाऱ्यावरही ढग दाटून आले आहेत. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार होत असून, ‘ऑक्टोबर हीट’चा चटका नाहीसा झाला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते १० अंशांनी, कोकणात १ ते ५ अंशांनी, मराठवाड्यात १ ते ४ अंशांची घट झाली आहे. पश्चिम विदर्भात कमाल तापमानात २ ते ८ अंशांची घट असून, पूर्व विदर्भात मात्र तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

webTittle: 'Car' Hurricane near the Konkan coast

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com