BREAKING | पाकिस्तानमध्ये शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला

BREAKING | पाकिस्तानमध्ये शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला

कराची: कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. चार दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनानं दिली आहे. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू आहे.  पाकिस्तानमधल्या कराचीत दहशतवादी हल्ला झाला आहे.

चार दहशतवाद्यांपैकी तिघांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर एक दहशतवादी अद्याप आतमध्ये लपला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच संपूर्ण परिसर सील केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दहशतवाद्यांनी कराची शेअर बाजारात शिरताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्रेनेड हल्ला केला. याशिवाय अंदाधुंद गोळीबारदेखील करण्यात आला.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांची पोलिसांचा गणवेश घातला होता. एका वाहनातून आलेल्या या दहशतवाद्यांनी पार्किंगमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारावर हल्ला केला. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घालण्यात आले.कराची शेअर बाजारावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये खळबळ माजली आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवादी सामिल असल्याची माहिती सीसीटीव्हीतून समोर आली. हे चारही दहशतवादी सुरक्षा यंत्रणांच्या चकमकीत ठार झाले असल्याची माहिती पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे.

चार दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत कराचीतल्या शेअर बाजारात घुसले. त्यांनी शेअर बाजाराच्या इमारतीवर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला सुरू केला. याची माहिती मिळताच पाकिस्तानी सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचलं. कराचीमध्ये असणारा शेअर बाजार अतिसुरक्षित विभागात येतो. या भागात अनेक खासगी बँकांची मुख्यालयं आहेत. हल्ला करणाऱ्या चारपैकी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती कराची पोलीस दलाचे प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी दिली. 
 

WebTittle ::BREAKING | Terrorist attack on stock market in Pakistan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com