महाबळेश्वरमध्ये उगवणार आता निळा भात : कृषी विभागाचा नवा उपक्रम

Blue rice will now grow in Mahabaleshwar.
Blue rice will now grow in Mahabaleshwar.

सातारा - महाबळेश्वरमध्ये Mahabaleshwar कृषी विभागाच्या Department of Agriculture माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. यापूर्वी  विविध प्रयोग Experiment करून पिके Crops घेतली आहेत. यामध्ये काळा गहू Black wheat, केशर Saffron यांची लागवड केली आहे. कृषी विभागाने Department of Agriculture असे विविध उपक्रम राबवून महाबळेश्वरच्या Mahabaleshwar आल्हाददायी वातावरणाचा  तेथील स्थानिक शेतकऱ्यांना Local farmers कसा फायदा होईल हे शेतकऱ्यांना सिद्ध करून दिले आहे. ( Blue rice will now grow in Mahabaleshwar : New initiative of Agriculture Department)

सध्या अशाच एका अभिनव उपक्रम कृषी विभाग राबवत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील बिरमनी येथील प्रकाश मोरे यांच्या शेतात Blue rice भाताच्या निळ्या वाणाची पेरणी केली आहे. हे वाण इंडोनेशिया Indonesia देशातील आहे.

हे देखील पहा - 

आसाममधील काही शेतकऱ्यांनी निळ्या भाताची लागवड केली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्याने निळ्या भाताचे बियाणे तिथून आणले होते. त्यापासून अनेक बियाणे तयार केले गेले. त्यापैकी 50 किलो बियाणे महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध केले आहे. अशी माहिती कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्डे यांनी दिली आहे.  

  
या पिकाची लागवड करण्यामागचे कारण म्हणजे निळा भात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतो. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, झिंक ही अन्नद्रव्ये असतात. यामुळे शरीराची होणारी झीज भरून निघते. अशा  पौष्टिक निळ्या भाताच्या लागवडीमुळे येथील शेतकऱ्यांना एका नवीन प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळणार आहे.

सध्या महाबळेश्वर तालुक्यातील बिरमनी येथील शेतकाऱ्यांच्या शेतात या पिकांची लागवड केलेली आहे. यानंतर वाढा कुंभरोशी, बिरवाडी, कासरूंड, भोसे, पांगारी, दानवली या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा हे वाण देण्यात येणार आहे.

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com