महाविकास आघाडीविरोधात भाजप-मनसे एकत्र येणार?

महाविकास आघाडीविरोधात भाजप-मनसे एकत्र येणार?


मुंबई - राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपची शिवसेनेबरोबर मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळ युती होती. मात्र ही युती मोडून तीन पक्षांचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झाले. यामुळे भाजपला राजकीय धक्‍का बसल्याचे मानले जाते. यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपच्या गडात भाजपचा धक्‍कादायक पराभव झाला.


यामुळे राज्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज भाजपला आल्याने भाजपने नवीन मित्राचा शोध घ्यायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. यामुळे शिवसेनेतून बाहेर फुटून निर्माण झालेला मनसे हा राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेची जागा घेऊ शकतो, असे भाजपमधील धुरिणांना वाटत आहे. याचा लाभ शहरी भागात भाजपला होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात मनसेची ताकद आहे. याचा लाभ होईल. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी मनसेची उपयुक्‍तता मोलीची आहे, असा अंदाज भाजपमध्ये लावला जात आहे.

Web Title: BJP-MNS will unite against mahavikas aghadi
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com