कल्याण पूर्वेत तृतीय पंथीयांसाठी आश्रम सुरु

Ashram for third sects started in Kalyan East
Ashram for third sects started in Kalyan East

कल्याण -  कल्याण पूर्व Kalyan East येथील द्वारली परिसरात तृतीय पंथियांसाठी Third sects Ashram आश्रम सुरु करण्यात आले आहे. या आश्रमाचे उद्घाटन Inauguration of Ashram भाजप आमदार गणपत गायकवाड BJP MLA Ganpat Gaikwad यांच्या हस्ते करण्यात आले आहे. Ashram for third sects started in Kalyan East

कल्याण पूर्व येथील द्वारली परिसरात तृतीय पंथियांसाठी आश्रम सुरु करण्यात आले आहे. या आश्रमाचे उद्घाटन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग आणि राष्ट्रीय समाजिक सुरक्षा संस्थान यांच्यावतीने हे आश्रम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी 25 ट्रान्सजेंडर यांच्या वास्तव्याची सुविधा करण्यात आली आहे. 

हे देखील पहा -

या आश्रमात Ashram 18 ते 60 वयोगटातील ट्रान्सजेंटर Transgender या ठिकाणी राहू शकतात. जे ट्रान्सजेंडर Transgender निराधार आहेत. तसेच ज्यांचे वय झाल्याने आत्ता काम करु शकत नाहीत. त्यांच्यासाठी हे आश्रम खऱ्या अर्थाने आधार देणारे ठरणार आहे. 

या आश्रमात जेवणाची सोय केली आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचं आश्रम सुरु केल आहे. परंतु राज्यात दोनच ठिकाणी अशा प्रकारच्या आश्रम सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.  त्यापैकी कल्याणमध्ये आश्रम कालपासून सुरु झालं आहे. त्याचबरोबर गोरेगाव येथेही अशा प्रकारचं आश्रम सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी किन्नर अस्मिताच्या निता केणे, तमन्ना केणे, सचिन तांबे आणि माधूरी शर्मा आदी उपस्थित होते. 

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com