गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी पुण्यातमधील हे हौद वापरा

गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी पुण्यातमधील हे हौद वापरा

पुणे : खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील विसर्जन हौद पाण्याखाली गेले आहेत. आज गौरी गणपतीच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक विसर्जन घाटावर येणार आहेत. तरी पुणेकरांनी भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल या हौदाचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

डेक्कन, शनिवार पेठ, टिळक पुल, आपटे घाट, पटवर्धन, अष्टभुजा, लकडी पुल, एस. एम जोशी, भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल या ठिकाणी मध्यवर्ती पुण्यातील विसर्जन घाट आहेत. आज खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विर्सग सुरु असल्यामुळे यापैकी  डेक्कन, शनिवार पेठ, टिळक पुल, आपटे घाट, पटवर्धन, अष्टभुजा, लकडी पुल हे नदीपात्रातील हौद पाण्याखाली गेले आहेत तर, नदीपात्राबाहेर असलेले भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल येथील हौद विसर्जनासाठी उपलब्ध आहेत. 

पुणेकरांनी  भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल या हौदांचा वापर करावा असे आवाहन महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी केले आहे. 

Web Title: This artificial tank for immersion is Available at pune in Ganesha Festival 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com