ट्रिपल कॅमेऱ्यासह 'आयफोन 11' लाँच

ट्रिपल कॅमेऱ्यासह 'आयफोन 11' लाँच

कॅलिफोर्निया : ऍपलच्या पुढील श्रेणीतील आयफोनची प्रतीक्षा अखेर मंगळवारी रात्री संपली. कंपनीने आयफोन 11 श्रेणीतील तीन नवे आयफोन सादर केले आहेत. तसेच यंदा कंपनीने आयफोनची किंमत आवाक्यात ठेवली आहे.

कंपनीच्या स्टीव्ह जॉब्ज सभागृहात मंगळवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात आयफोन, आयपॅड, ऍपल वॉचच्या नव्या मॉडेलसह ऍपल टीव्ही सेवा आणि ऍपल आर्केड या व्हिडिओ गेम सेवेची घोषणा करण्यात आली. कंपनीने आयफोन 11 आणि यातील प्रो व प्रो मॅक्‍स मॉडेल सादर केली आहेत. 

आयफोन 11 : 
- सहा रंगांत उपलब्ध 
- स्पेशल ऑडिओ आणि डॉल्बी ऍटमॉस 
- ट्रिपल कॅमेरा सिस्टिम 
- एलसीडी रेटिना लिक्विड डिस्प्ले 
- 4 के व्हिडिओचे 60 एफपीएस तसेच स्लो मोशनमध्ये चित्रण 
- आधीच्या मॉडेलपेक्षा एक तास अधिक काळ बॅटरी क्षमता 
- किंमत 699 डॉलर (सुमारे 49,629 रुपये) 

ऍपल आर्केड 
-
व्हिडिओ गेम सेवा 
- आयओएस ऍपस्टोअरवर उपलब्ध 
- संपूर्ण कुटुंबासाठी दरमहा 4.99 डॉलर (सुमारे 355 रुपये) 

ऍपल टीव्ही प्लस + विशेष शो
- शंभरहून अधिक देशांत सेवा 
- संपूर्ण कुटुंबासाठी 4.99 डॉलर (सुमारे 355 रुपये) 
- आयफोन, आयपॅड, मॅकच्या खरेदीवर टीव्हीचे एक वर्षाचे सदस्यत्व मोफत 

7 जनरेशन आयपॅड
- 10.2 इंच रेटिना डिस्प्ले 
- स्मार्ट कनेक्‍टरने ऍपल की-बोर्डशी जोडता येणार 
- किंमत 329 डॉलर (सुमारे 23 हजार 359 रुपये)


Web Title: Apple goes economical with iPhone 11 India pricing
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com