अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली: 'दोन पिढ्यांचे मनोरंजन करणारे व प्रेरणा देणारे महानायक अमिताभ बच्चन यांची एकमताने दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे. संपूर्ण देश व आंतररराष्ट्रीय समुदाय आनंदी आहे', असे ट्विट करीत जावडेकर यांनी देशाला ही शुभवार्ता कळवली. सुवर्णकमळ, शाल व १० लाख रु. रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार तसेच तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला या पुरस्कारामुळे नवी झळाळी लाभली आहे.

चित्रपट, टीव्ही, सोशल मीडिया अशा भारतीय समाजाच्या भावभावनांचा कल्लोळ उठणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान नेहमीच उंचावर ठेवलेल्या ७६वर्षीय अमिताभ यांनी सहायक अभिनेता, मुख्य अभिनेता, चरित्र अभिनेता हा प्रवासही प्रवाही व प्रयोगशील ठेवला. पद्मविभूषण, फ्रान्सचा 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर', ऑर्डर ऑफ अफगाणिस्तान यांसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसोबतच आता हा नवा तुरा खोवला गेला आहे.
 

भारदस्त आवाज, अचूक संवादफेक, चौफेर अभिनय, चाकोरीबाहेरील देहबोलीमुळे दोन पिढ्या प्रत्येक भारतीयावर गारूड घातलेल्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा करताच, केवळ चित्रपटच नव्हे, तर देशातील प्रत्येक कलाक्षेत्रातून अमिताभ यांच्यावर आनंद व कौतुकाचा वर्षाव झाला.


Web Title amitabh bachchan gets dadasaheb phalke award

.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com