'ये दिवार तुटती क्यू नही' अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार अजित पवार

'ये दिवार तुटती क्यू नही' अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार अजित पवार

मुंबई :  ये दिवार तुटती क्यू नही... ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे xxxx... xxx... xxx सिंमेटसे जो बनी है' अशा शब्दात महाविकास आघाडी पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपाला जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात लगावला.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आहे. तर शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग अजित पवार यांनी यावेळी फुंकले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार किरण पावसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, खासदार माजीद मेमन, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, उपस्थित होते.

सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्याबद्दल मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे पवार यांनी यावेळी अभिनंदन केले. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय घेण्यात यावा असा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरु केली आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले. चुकीचे निर्णय आम्हाला वाटतात ते भाजपाला चांगले वाटतही असतील. ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत. आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत. ज्या कामांच्या बाबतीत शंका येते. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली आहे असेही ते म्हणाले.

''विधानसभेत नवाब मलिक निवडून आले आहेत. दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. पुढच्या काळात समविचारी पक्षांना घेवून शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. जास्तीत जास्त १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत,'' असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देण्याचे पवार यांनी जाहीर केले. १६ मंत्र्यांनी एक एक दिवस जरी दिला तरी चांगलं नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

WEB TITLE- Ajit Pawar will take time to say 'this wall will not break'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com