अजित पवार जळगावात : महाजनांना आता दे धक्का

अजित पवार जळगावात : महाजनांना आता दे धक्का

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानसभेत जळगाव जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही, केवळ एकच जागा मिळाली, त्यामुळे पक्षाचे नेते शरद पवार यानीं जिल्ह्याकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याला जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे. 

जळगाव जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल आठ आमदार होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाला मोठा फटका बसला, पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला. त्यामुळे जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार यानीं विशेष लक्ष दिले आहे.

विधानसभा निवडणूकीनंतर त्यांनी एक दौरा जळगाव जिल्ह्यात केला, आता पुन्हा 9 मार्चला त्यांचा दौरा आहे. या शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनीही नुकताच दौरा केला. दोन्ही नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेवून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करण्याचे अवाहन केले. 

खासदार सुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकितच जिल्हाला एक दमदार संपर्कमंत्री दिला जाईल अशी घोषणा केली होती. तो कोण आहे हे आपण सागंणार नाही, परंतु जिल्ह्यात एक जोश निर्माण होईल तसेच कार्यकर्त्याची कामे करण्याची उमेद असलेला संपर्कमंत्री दिला जाईल असेही त्यानीं स्पष्ट केले होते. त्यामुळे जिल्ह्याचा संपर्कमंत्री कोण असणार याबाबत उत्सुकता होती. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फेसंपर्कमंत्र्यांची यादी लवकरच जाहिर होत आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री म्हणून उपमुखमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. 

जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, माजी मंत्री एकनाथ खडसे, गिरीश महाजन हे भाजपचे दिग्गज नेते आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री म्हणून नियुक्त होत असल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राजकाणाला वेग येण्याची शक्‍यता आहे. 

web title- Ajit pawar give shock to Mahajan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com