संस्कृत मधील चारही वेदांचे भाषांतर करणारा 99 वर्षाचा अवलिया...

old man
old man

डोंबिवली- वयाच्या 99 व्या वर्षी सुद्धा आपल्या गुरूच्या Guru आज्ञेचे पालन करत संस्कृत मधील चारही वेदांचे Vedas टिप्पणी सहित अनुवाद करनाऱ्या डोंबिवलीतील Dombavali डॉ. भीमराव कुलकर्णी Bhimrao Kulkarni यांना जास्तीत जास्त संस्कृत उपनिषदे आणि वाड्मय मराठीत  Marathi अनुवादित करून पुढच्या पिढीसाठी त्याचा ठेवा जतन करण्याचा ध्यास आहे. म्हणूनच तर या वयात देखील त्यांनी तीन आठवडे कोरोनाशी Corona यशस्वी लढा देत पुन्हा आपल्या लिखाणाला सुरुवात केली आहे. 99 year old man translating all the four Vedas in Sanskrit

केइम रुग्णालयातून Hospital प्रोफेसर म्हणून निवृत् झाल्यांनातर भीमराव यांनी 1996 पासून वेदाच्या अनुवादाला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी 6 वर्षे माहिती गोळा करण्याबरोबरच प्रचंड वाचन केले. त्यांचे यजुर्वेद आणि ऋग्वेद हे दोन्ही मराठीतील ग्रंथ प्रसिद्ध झाले असून सामवेद आणि अथर्ववेद या ग्रंथाचे अनुवाद पूर्ण झाले आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात प्रिंटिंग बंद असल्याने या ग्रंथाची छपाई थांबली आहे.

हे देखील पहा -

मात्र ठाण्यातील दाजी पणशीकर यांनी या ग्रंथाच्या पब्लिशिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. नुकत्याच 18 मे रोजी 99 व्या वर्षात पदार्पण केलेले कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकारने वेद विद्या विशारद पुरस्काराने सन्मानित केले आहे. मात्र आजच्या पिढीला संस्कृत वाचता येत नसल्याची त्यांना खंत आहे. शाळांमधून संस्कृतचे शिक्षणच बंद झाल्याने आपले गहन ज्ञान देणारे वाड्मय काळाच्या ओघात लुप्त होण्याची भीती त्यांना वाटत आहे. 99 year old man translating all the four Vedas in Sanskrit

म्हणूनच संस्कृत शाळा सुरू केले जावे अशी त्यांची मागणी आहे.ज्यामुळे संस्कृत वाड्मय नव्या पिढीला आत्मसात करणे सोयीचे होईल असा विश्वास त्यांना वाटत आहे. दरम्यान कोरोना नंतर येणाऱ्या थकव्या मुळे त्यांना अखंड काम करणे कठीण बनले आहे. मात्र यावर देखील मात करत पुन्हा एकदा उपनिषदे आणि इतर वाड्मय अनुवादित करण्याचा त्यांचे ध्येय असून त्याकडे त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com