चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला

चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला


नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत त्यांना मोठा झटका दिली. त्यामुळे आता ईडीकडून त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

एअरसेल-मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चिदंबरम आणि त्यांच्या पुत्राच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. तपास संस्था आणि चिदंबरम यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवत याबाबतचा आदेश पाच सप्टेंबर रोजी देण्यात येईल, असे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी स्पष्ट केले होते. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर त्यांच्या जामीन अर्ज फेटाळून चौकशीत अडथळे येऊ शकतात अशी शक्यता वर्तविली. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला.  

दरम्यान, चिदंबरम आणि त्यांच्या पुत्राकडून चौकशीत सहकार्य केले जात नाही. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी कोठडी देण्याची मागणी करीत त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला सुनावणी वेळी तपास संस्थांकडून विरोध करण्यात आला. 


Web Title: Chidambaram Supreme Court rejects anticipatory bail in ED case
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com