जीडीपीचा दर घटून पाच टक्क्यांवर,चिंतेचे वातावरण

 जीडीपीचा दर घटून पाच टक्क्यांवर,चिंतेचे वातावरण

नवी दिल्ली -  घटलेल्या जीडीपीच्या टक्केवारीमुळे सरकार अर्थव्यवस्थेबाबत निराश झाले आहे का अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, ''आपण ज्या शब्दांचा वापर करत आहोत. त्यावरून आपण मंदीचा सामना करत आहोत, असे वाटते. त्यामुळे बोलताना आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्ती आलेली आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेचीही स्थिती खराब आहे. मात्र असे असतानाही आपण पाच टक्के विकासदरासह आगेकूच करत आहोत.

 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा दर घटून पाच टक्क्यांपर्यंत आल्याचे जाहीर होताच देशातील अर्थजगतामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र देशाच्या आर्थिक विकास दरात मोठी घट झाली असतानाही देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा बचाव केला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सुस्ती असतानाही गाठलेला पाच टक्के विकासदर हा वाईट म्हणता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक आघाडीवरून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. 

जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकच गहिरे झाले आहे.  चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा (एप्रिल ते जून) जीडीपीचा आकडा समोर आला असून, या काळात देशाच्या जीडीपीची वाढ घटून पाच टक्क्यांवर आली आहे. 


Web Title: Chief economic adviser says 5 percent growth is not bad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com