दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर

दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर

पुणे: दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला. एकूण २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५०, ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत ही परीक्षा झाली होती.


गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवार ३१ ऑगस्ट ते सोमवरा ९ सप्टेंबर पर्यंत आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. 


विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे. 


मंडळनिहाय निकाल 

विभागीय मंडळ - टक्केवारी 

लातूर - ३१.४९ 
नागपूर - ३०.८९ 
अमरावती - २९.५३ 
औरंगाबाद - २८.२५
नाशिक - २५.०८
पुणे - १८.१२ 
कोकण - १५.८१ 
कोल्हापूर - १५.१७ 
मुंबई - १४.४८ 

Web Title ssc supplementary exam result declared by state board

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com