अ‍ॅमेझॉन जंगलासाठी ब्रिटन करणार मदत

अ‍ॅमेझॉन जंगलासाठी ब्रिटन करणार मदत

बियारिट्झ : अ‍ॅमेझॉनमधील आगीच्या थैमानाने खोऱ्यातील जंगलासह वन्यजीवन उध्वस्त झाले. आता हे जंगल पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटिशचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी 10 दशलक्ष पौंड देण्याची घोषणा केली. आगीमुळे ज्या भागांचे नुकसान झाले त्यांच्यासह जंगल निर्माण करण्यासाठी ताबडतोब हा पैसा उपलब्ध केला जाईल, असे ब्रिटिश सरकारने येथे जी सेव्हन शिखर परिषदेत निवेदनात म्हटले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी अॅमेझॉनसाठी मदत मागितली आहे. मदत देण्यासाठी जगातील नेत्यांनी तयारी दर्शवली आहे. अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे जंगल असल्याने जगाने ते संकटात असताना सर्व जगाने मदत करावी असे जॉन्सन यांनी म्हणले आहे. जी 7 देशांच्या नेत्यांची शिखर परिषद सोमवारी अ‍ॅमेझॉनमधील जंगलाला लागलेल्या आगीसह जागतिक प्रश्नांवर चर्चा करून संपली; परंतु तिच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार युद्ध आणि जी सेव्हन गटाच्या ऐक्याचा निर्माण झालेला प्रश्न यांची सावली पडलेली होती. इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद झरीफ हे इराणच्या वादग्रस्त ठरलेल्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून जी राजनैतिक कोंडी निर्माण झाली आहे तिच्यावरील चर्चेत संतापले. 

अ‍ॅमेझॉनचे 60 टक्के जंगल हे ब्राझिलमध्ये असून, त्याचा काही भाग हा बोलिव्हिया, कोलंबिया, एक्युअडोर, फ्रेंच गुयिआना, गुयाना, पेरू, सुरिनाम आणि व्हेनेझुएलात आहे. 
 


Web Title: Britain s 10 million pounds for Amazon forests in g7 summit
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com