कोरोनाने गिळल्या 600 कोटींच्या कोंबड्या

कोरोनाने गिळल्या 600 कोटींच्या कोंबड्या

अहमदनगर ःबाबासाहेब हारदे, अभिषेक खंडागळे, सचिन भोंगळ, उमेश बनकर, राजेंद्र वर्पे, शिवाजी शिंगोटे, बाळासाहेब लहाने आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की मंदीमुळे विक्रीचे भाव दररोज ढासळत आहेत. पोल्ट्री व्यावसायिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाला "कोरोना'च्या अफवेमुळे 600 कोटींचा फटका बसला आहे. सरकारने आठ दिवसांत नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी,'' अशी मागणी नगर जिल्हा पोल्ट्री फेडरेशनतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा सामूहिक आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

खर्चापेक्षा मिळणारा बाजारभाव अत्यंत तोकडा असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पावसाच्या लहरीपणामुळे अगोदरच शेती व्यवसाय अडचणीत आहे. सरकारने किमान वेतन कायद्यांतर्गत पोल्ट्री व्यवसाय स्वतंत्र न समजता तो "शेती' म्हणून समजण्यात येईल, असे धोरण निश्‍चित केले आहे. 

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची करा अन्यथा...
सोशल मीडियाच्या माध्यमातून चिकन व अंडी खाल्ल्यामुळे "कोरोना'चा आजार होतो, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना देण्यात आले. 

WEB TITLE-  2 crore loss due to corona

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com