परळ वर्कशॉप बंद होणार

परळ वर्कशॉप बंद होणार

परळ रेल्वे कारखान्याच्या जागी टर्मिनस उभारणे प्रस्तावित होते. यासाठी मध्य रेल्वेने ऑक्टोबर, २०१७मध्ये येथील कारखाना बंद करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला होता. या प्रस्तावावरील चर्चेअंती परळ कारखाना बंद करण्याचा संबंधित प्रस्ताव रेल्वे मंडळाने मंजूर केला आहे, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-२बी) अंतर्गत परळ टर्मिनस उभारण्यात येणार आहे. सध्या परळ टर्मिनसचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे. दुसरा टप्पा मार्च, २०२१पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. मात्र सद्यस्थिती पाहता परळ टर्मिनसचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यास बराच काळ लोटणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

'परळ कारखान्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांना मुंबई क्षेत्राबाहेर हलविण्यात येणार नाही. मुंबई क्षेत्राबाहेर काम करू इच्छिणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची अन्य कारखान्यांत आवश्यकतेनुसार बदली करण्यात येईल', अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.


परळ रेल्वे कारखाना बंद करून त्या ठिकाणी परळ टर्मिनस उभारण्यात येईल. कारखान्याची उर्वरित जागा व्यावसायिकरणासाठी देण्याचे नियोजन आहे. मात्र नेमक्या किती एकर जागेचे व्यावसायिकरण होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. परळ वर्कशॉपचा विस्तार ४७ एकर असून, रेल्वे कॉलनी तीन एकरांवर वसली आहे.कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांना माटुंगा आणि सानपाडा येथील कारखान्यात पाठवून परळ रेल्वे कारखाना (वर्कशॉप) बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे तब्बल १५ हजार एकर परिसरात परळ कोचिंग टर्मिनस उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा रेल्वे मंडळाचा लेखी आदेश शुक्रवारी मध्य रेल्वेला प्राप्त झाला आहे.

रेल्वे मंडळाने शुक्रवारी मध्य रेल्वेला पत्र पाठवून परळ कारखान्याबाबतचा निर्णय कळवला. परळमधील अपघातरोधक (एलएचबी) डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम माटुंगा रेल्वे कारखान्यातील मोकळ्या जागेत करावे, माटुंगा येथील लोकल देखभाल-दुरुस्तीचे काम सानपाडा कारखान्यात करावे, मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्यांना माटुंगा आणि सानपाडा कारखान्यात रुजू करावे, असा आदेश याद्वारे देण्यात आला आहे. या प्रकरणी माटुंगा रेल्वे कारखान्याचा विकास आराखडा बनवून रेल्वे मंडळाकडे सुपूर्द करा, असा आदेशही देण्यात आला आहे.

Web Title :: 139 year old parel workshop will be shut

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com