Viral Zomato Girl  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Zomato Girl : शॉर्ट जिन्स, डोळ्याला गॉगल अन् स्पोर्ट्स बाइक; 'झोमॅटो गर्ल'चा VIDEO कंपनीच्या CEOपर्यंत पोहोचला अन्...

Viral VIdeo : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनीही या व्हिडीओची दखल घेतली आणि स्पष्टीकरण दिलंय.

प्रविण वाकचौरे

Zomato Delivery Girl Viral Video :

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओंची जोरदार चर्चा होते. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. झोमॅटो डिलिव्हरी गर्लचा हा व्हिडीओ आहे. ही तरुणी फूड डिलिव्हरी गर्ल कमी अन् मॉडेल जास्त वाटत होती.

तरुणी स्पोर्ट्स बाईकवर झोमॉटो कंपनीचा टीशर्ट घालून जात असतांना सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. मात्र ही तरुणी खरंच झोमॅटो डिलिव्हरी गर्ल आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, एक तरूणी स्पोर्ट्स बाइक चालवताना दिसत आहे. बाईक चालवणाऱ्या तरूणीनं फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीचा टीशर्ट घातला आहे. झोमॉटो कंपनीचा टीशर्ट, शॉर्ट जीन्स, गॉगल अन् मोकळे केस... असा या तरुणीचा लूक आहे. तरुणीने पाठीवर झोमॉटो कंपनीची बॅग देखील अडकवली आहे.

व्हिडीओतील तरुणीच्या बोल्ड लुकमुळे रस्त्यावरील सर्वाचे लक्ष तिच्याकडे जात आहे. हा व्हिडीओ @rajivmehta19 या पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील फनी कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनीही या व्हिडीओची दखल घेतली आणि स्पष्टीकरण दिलंय. या डिलिव्हरी गर्लचा आणि झोमॅटोचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच काय तर हा व्हिडीओ जिथला आहे, त्या इंदूरमध्ये झोमॅटोचा कुणी मार्कटिंग हेडही नाही, असंही दीपिंदर यांनी म्हटलं.

हेल्मेटशिवाय बाईक चालवण्याच्या आम्ही विरोधात असल्याचंही झोमॅटोच्या सीईओंनी सांगितलं. पण एखाद्या मुलीने डिलिव्हरी बॉयसारखं काम करण्यात गैर काहीच नाही, असंही ठळकपणे नमूद केलं. शिवाय झोमॅटोमध्ये अशा शेकडो मुली, महिला या फूड डिलिव्हरीचं काम करतात, असंही त्यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Shweta Tiwari: 'चाळीशीतही क्यूट दिसतेस' श्वेता तिवारीचे नवीन फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

SCROLL FOR NEXT