Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भररस्त्यावर तरुणांची मस्ती; थेट वाहनाने उडवले; जीवाचा थरकाप उडवणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद

Shocking Cctv Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक धक्कादायक अपघांताचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे. नक्की काय घडले असेल ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Shocking Incident - वाहन चालवताना किंवा रस्त्यावर फिरताना वारंवार सावधपणे फिरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकादा बरेच लोक हे गंभीररित्या घेत नाही आणि त्यातून भयानक अपघात होतात. सध्या, असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात भररस्त्यात दोन मित्रांना मस्ती करणं अत्यंत महागात पडले आहे.

घडले तरी काय?

व्हायरल (Viral) होत असलेल्या या घटनेत तुम्हाला रस्त्यावर दोन तरुण मित्र दिसत आहेत. ते एकमेकांना पकडण्यासाठी रस्त्यावरुन पळताना दिसत आहे. पण त्यानंतर मस्तीच्या नादात रस्त्याच्या मधोमध जासत असता. धक्कादायक म्हणजे, रस्त्याच्या मधोमध जाऊन मस्ती करत असताना एक तरुणाला त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाची टक्कर बसते आणि तो जोरदार उडाला जातो. सर्व थरकार उडवणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही घटना कुठल्या शहरातील आहे अद्याप समजले नाही. मात्र फेसबूक , ट्वीटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यंमावर हा व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे. त्यातच तो सध्या इन्स्टाग्रामवरील roadsafetyconten या अकाउंटवर पाहण्यासाठी मिळत आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळालेले असून असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या संताप

ही घटना पाहिल्यानंतर प्रत्येक लोकांनी तरुणांविषयी संताप व्यक्त केला आहे. कमेंटबॉक्समध्ये सर्वत्र आलेल्या प्रतिक्रियाह्या रागीटच आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''ती काय खेळण्याची जागा होती का? '' दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''मुर्खपणा आहे नुसता'' अशी अनेक मतं व्यक्त केली आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT