Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : उलट दिशेने बसून त्याने हायवेला सुसाट दुचाकी चालवली; पुढे जे घडलं ते तुम्हीच पाहा

Bike Stant Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण मुलं आणि मुली वाहतुकीचे नियम मोडत स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करतात. आताही असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Ruchika Jadhav

दुचाकी चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असते. मात्र सध्याचा तरुण पिढीला झालंय तरी काय असा प्रश्न मनात येईल अशा अनेक घटना दररोज घडत राहतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण मुलं आणि मुली वाहतुकीचे नियम मोडत स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करतात. आताही असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल आणि या तरुणावर संताप व्यक्त कराल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण दुचाकी चालवत आहे. दुचाकीवरून तो हायवेवर आला आहे. हायवेला सर्वजण सुसाट वेगात वाहने चालवतात. हा तरुण सुद्धा वेगात वाहन चालवताना दिसतोय. मात्र बाईक चालवत असताना त्याला स्टंट करण्याची इच्छा झालिये.

स्टंटसाठी हा तरुण थेट धावत्या बाईकवर उलट दिशेने बसला आहे. रस्ता न पाहता अचूक दुचाकी मी चालवू शकतो असं काहीसं त्याला दाखवून द्यायचं आहे. उलट दिशेने बसलेला असताना या तरुणाने मागे वळून एका हाताने बाईकचे हॅण्डल सुद्धा पकडले आहे. त्यात तो बॅलेन्स करत ड्रायव्हिंग करत आहे. तसेच अनेकदा हात सोडूनही त्याने दुचाकी चालवली आहे.

तरुणाचा व्हिडिओ @ghb_don24 या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. तरुण मुलं मुली अशी स्टंटबाजी करून स्वतः सह इतरांचा जीव देखील धोक्यात घालतात. अशा तरुणांना योग्य ती कारवाई झालीच पाहिजे असं नेटकरी म्हणत आहेत.

या आधी देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवर वनसाईड बसला होता. तसं बसून त्याने पूर्ण प्रवास केला. शिवाय चकित करणारी गोष्ट म्हणजे या व्यक्तीने दुचाकीचे हॅण्डल पकडले नव्हते. हायवेवर भरधाव वेगात त्याची दुचाकी पळत होती आणि तो आरामात हात मागे सोडून बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT