Mumbai Juhu Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Viral Video: संतापजनक! महिलेला पाहून तरुणाने काढली पँट? मुंबईतील जुहूमधील व्हिडिओ व्हायरल

Mumbai Juhu Viral Video : मुंबईत अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. जुहू परिसरात भर रस्त्यात एका तरुणाने महिलेला आवाज देऊन महिलेसमोर त्याने पॅन्ट काढून गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचाराच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रात्रीचे महिलांसाठी घराबाहेर पडणे सुरक्षित नाही, मात्र आता दिवसा देखील घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. यातच आता एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मुंबईच्या जुहू परिसरात भर रस्त्यात एका तरुणाने महिलेला आवाज देऊन महिलेसमोर त्याने पॅन्ट काढून गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार जुहू येथील जानकी कुटीर परिसरात आज सकाळी 8: 55 वाजता घडला. संबंधित महिलेनेच हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे.

महिलेने तरुणाचा चेहरा मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणावरून तरुणाने पळ काढल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेनंतर महिलेने निर्भया पथकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्भया पथकाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे या महिलेने म्हटले आहे.

यानंतर महिलेने आपली तक्रार एक्स या सोशल माध्यमातून मुंबई पोलिसांकडे केली आहे. शिवाय पोलिसांनी या ठिकाणी अधिक सुरक्षा वाढवावी ,अशी विनंती देखील केली आहे.

महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग केला. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही याची दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेला अधिक माहिती देण्याची विनंती केली आहे. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT