Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महिलांचे गहू सुकवण्याचे टेंशन संपले; तरुणाने शोधला भन्नाट जुगाड, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यात काही विनोदी तर काही भन्नाट जुगाड दाखवणारे असतात. अशा क्रिएटिव्ह जुगाडा व्हिडिओंना नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो.

Dhanshri Shintre

भारतीय नागरिक कल्पकतेत अव्वल असून, जुगाड करण्याच्या कौशल्यात तर त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. भारतात कोणतीही वस्तू सहज निरुपयोगी ठरत नाही, कारण येथे जुगाडू लोकांची कमतरता नाही. अशा भन्नाट कल्पनांमुळे मोठमोठे इंजिनियर्स देखील थक्क होतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही विनोदी असतात, तर काही भन्नाट जुगाड दाखवणारे असतात. हे अनोखे जुगाड पाहून लोक दंग होतात आणि या क्रिएटिव्ह कल्पनांना भरभरून प्रतिसाद देतात. अनेकदा या जुगाडुंचे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतात आणि नेटिझन्स त्यांना कौतुकाने डोक्यावर घेतात.

सध्या बाजारात गव्हाचं पीठ सहज उपलब्ध असलं तरी, अनेक घरांमध्ये गहू निवडून, धुवून आणि सुकवून मगच दळण्यासाठी गिरणीवर पाठवला जातो. मात्र, मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान घरांमुळे गहू सुकवण्यासाठी जागेची अडचण असते. यावर उपाय म्हणून एका तरुणाने चक्क वॉशिंग मशिनचा उपयोग गहू सुकवण्यासाठी केला आहे! हा भन्नाट जुगाड पाहून सोशल मीडियावरील नेटकरी थक्क झाले असून, जुगाडू भारतीयांची क्रिएटिव्हिटी पाहून साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा भन्नाट जुगाड चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्ही आजवर वॉशिंग मशिन कपडे धुण्यासाठी वापरताना पाहिली असेल, पण या तरुणाने चक्क गहू सुकवण्यासाठी तिचा वापर केला आहे. व्हिडीओमध्ये हा तरुण आधी भिजवलेले गहू एका कपड्यात घट्ट बांधतो आणि ते गाठोडं थेट वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये ठेवतो. अवघ्या पाच-सात मिनिटांत कपड्यांप्रमाणेच गहूही कोरडे होतात! हा अनोखा प्रयोग पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले असून, भारतीयांच्या जुगाडू बुद्धीमत्तेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

@altu.faltu नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेल्या या भन्नाट जुगाडाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये वॉशिंग मशिनमध्ये गहू सुकवण्याचा अनोखा प्रयोग पाहून लोक थक्क झाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ४७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, एका युजरने कमेंट केली आहे, 'नाद करा पण आमचा कुठं'. नेटिझन्सनी या क्रिएटिव्ह कल्पनेचं कौतुक केलं आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT