Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रीलचा नाद लय बेक्कार! धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला घडली अद्दल, पाहा धक्कादायक व्हिडीओ

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत तरुणाचा धावत्या ट्रेनमध्ये स्टंट पाहण्यास मिळतोय.

Tanvi Pol

Young Man Stunt Video: सोशल मीडियावर कायम तरुणांच्या विविध करामतीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजच्या काही तरुण पिढीला सोशल मीडिया हे प्रसिद्ध होण्याचे वेगवान माध्यम वाटत असते. कमी कालावधीत प्रसिद्ध होण्यासाठी मग धोकादायक ठिकाणी धोकादायक स्टंट करण त्यांना आवडायला लागले आहे. अशातच सोशल मीडियावर एका तरुणाचा असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करणं त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण आपल्याला दिसून येत आहे. जो धावत्या ट्रेनच्या दरवाजात एका लोखंडी खांबाला पकडून उभा आहे. ट्रेनचा ही वेग जास्त दिसून येत आहे. या धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभा राहून तरुण स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. एक हात खांबाला पकडून तो बाहेरील झाडांना हात लावण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व व्हिडिओ स्टंट (Stunt) करणाऱ्या तरुणाचा मित्र करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र काही वेळातच स्टंट करताना अचानक तरुणाचा धक्का एका धावत्या ट्रेनमधून एका बाहेरील खांबाला लागतो आणि तरुण क्षणात ट्रेनमधून खाली कोसळतो.

तरुणाचा स्टंट व्हिडिओ 'इन्स्टाग्रा' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@46_tattooink_studio_karaikkudi'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण एका दिवसापूर्वी इन्स्टाग्रावर शेअर होताच लाखोच्या संख्येने इन्स्टाग्राम यूजर्संनी पाहिला आहे शिवाय अजूनही व्हिडिओला असंख्य व्ह्यूज मिळत आहे. एवढेच नाही तर याआधीही सोशल मीडियावर तरुणांच्या अशा स्टंटचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे.

तरुणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला. मग काय असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी बऱ्याच प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नेहमीचा आहे हे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' अजून कर स्टंट'' अशा प्रकारे अनेक संतापजनक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिलेल्या आहे. मात्र हा व्हिडिओ खरं तर कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

Nail Art Designs: लग्नसराईसाठी ट्राय करा नवा नेल आर्ट, पाहा हे ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT