Shocking Video saam tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: कहरच...! बापरे हाय व्हॉलटेज तारेवर बसून जीवघेणा व्यायाम, व्हायरल VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Viral Video: हाय व्हॉलटेज तारेला स्पर्श केल्याने लोकांचा मृत्यू होतो, पण एका व्यक्तीने त्या वायरला लटकून पुल-अप करताना त्याला मृत्यूचा अजिबात भीती वाटत नाही, असं दिसत आहे.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये कधी आपल्याला हसू येते, तर कधी आश्चर्यचकित होतो. अलीकडेच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्यात एक व्यक्ती हाय व्हॉलटेज विजेच्या तारेला धरून पुल-अप करत आहे. ज्या तारेला स्पर्श केल्यावर सामान्यपणे व्यक्ती जळून राख होतात, त्या तारांवर हा माणूस आरामात व्यायाम करत आहे.

या व्हिडिओने पाहणाऱ्यांना थोडं आश्चर्यचकीत केलं आहे, कारण एका व्यक्तीला हाय व्हॉलटेज तारांवर असा व्यायाम करताना पाहून त्याला शुद्धीवर असण्याची शंका येते. अशा परिस्थितीत लोकांना तो माणूस कसा धाडसी आहे, हे पाहून आश्चर्य वाटत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हाय व्हॉलटेज वायर्सला धरून कोणत्याही भीतीशिवाय पुल-अप करताना दिसतो.

त्याला तारांवर व्यायाम करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. व्हिडिओच्या सुरुवातीला, तो व्यक्ती तारांना धरून आणि त्यावर पाय चिकटवून खांबावर पुल-अप करत होता. काही वेळाने तो त्या तारांवर बसलेला देखील दिसला. त्याच्या या धाडसी वर्कआउटमुळे लोक त्याच्या शौर्याचा आणि धैर्याचा अभिमान करत आहेत.

हा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @FitnessHaven या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिपर्यंत, २० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि दीड लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं. व्हिडिओ कधी आणि कुठला आहे याबद्दल माहिती मिळालेली नाही. या व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक म्हणाले, हा माणूस मृत्यूला थेट डोळ्यात पाहत आहे, तर काहींनी म्हटले, देशी दारूची जादू आहे किंवा त्याच्याकडे सुपर पॉवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT