Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रील्सच्या नादात जीव गमावला; नदीत बुडून तरुणीचा मृत्यू

Shocking incident Video: रील्स बनवणे हे प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. मात्र, सध्या रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीसोबत भयंकर घडलेले आहे. असे काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

River Accident: आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर रील्सचा ट्रेंड वाढत आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या माध्यमाचा प्रचंड वापर करत आहेत. त्यातही तरुणाईचा हिस्सा अधिक मोठा आहे. रील्स बनवणे आणि त्या पोस्ट करणे, व्हायरल होणे, हे एक प्रकारचे आकर्षण बनले आहे. परंतु या सोशल मीडियाच्या जगात कधी कधी माणसांच्या जीवनाशी संबंधित काही गंभीर प्रसंग देखील घडतात. सध्या अशीच एक दुर्दैवी आणि वेदनादायक घटना घडली आहे.

फोटो आणि रील्सचा नाद जीवावर बेतला!

व्हायरल होत असलेल्या घटनेत एक तरुणी रील्स (Reels) काढण्याच्या नादात नदीत उतरली आणि पाण्यात बुडाली आहे. व्हायरल होत असलेली ही घटना उत्तर काशीमधील असल्याचे समजते. जिथे नदी किनाऱ्यावर मजा करण्याचे नियोजन होतं आणि त्यातून रील्स काढण्याचा तरुणीला विचार आला. मात्र, असे काही घडणारं कोणाला माहिती नव्हते. सर्व धक्कादायक घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ काही क्षणात प्रत्येकजणाने पाहिला आहे.

हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे आणि इन्स्टाच्या saamtvnews या अकाउंटवर अपलोड केलेला आहे. मात्र, तो फेसबूक आणि अन्य माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी काही मिनिटांत हजारो लाईक्स दिलेले आहेत तर १ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत.

व्हिडिओने उडवली खळबळ

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर लोकांनी विविध मतं व्यक्त केली आहेत. काही लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजरने कमेंट केली,''हे असं वारंवार घडतं आहे'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली की,''तरुणाईल खूप वेडं लागलं आहे'' तर अजून एका यूजरने कमेंट केली,''तरुणाई पालकांच्या मनाचा विचार करतं नाहीत'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राणेंचं स्टिंग ऑपरेशन, महायुतीची पोलखोल, भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशांची बॅग

नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

पालिका निवडणुकीतही 50 खोके, भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या

SCROLL FOR NEXT