Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: तहान भागवण्यासाठी जीवघेना प्रवास; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Viral Video: व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला जीव मुठीत घेऊन आपल्या घरी हांड्याने पाणी नेत आहेत. पाणी घेऊन जाताना त्यांना एक मोठी नदी लागते. ही नदी पार करून त्यांना पुढे जायचं आहे.

Ruchika Jadhav

Women's Struggle For Drinking Water:

प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. एक वेळ जेवण कमी मिळाले तरी चालेल मात्र पाणी पोटभर मिळालं पाहिजे. अनेक राज्यांमध्ये पावसाअभावी पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. अशात सोशल मीडियावर काळजात धडकी भरवणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला जीव मुठीत घेऊन आपल्या घरी हांड्याने पाणी नेत आहेत. पाणी घेऊन जाताना त्यांना एक मोठी नदी लागते. ही नदी पार करून त्यांना पुढे जायचं आहे. त्या जेथून नदी पार करत आहेत तेथे जाण्यासाठी दोन बांबू सारख्या काठ्या ठेवण्यात आल्या आहेत. या छोट्याश्या काठीवरून महिला नदी पर करत आहेत.

अगदी एक पाय सुद्धा नीट मावणार नाही एवढी कमी जागा येथे आहे. मात्र तरीही महिला एवढ्या कमी जागेत डोक्यावर हंडा घेऊन प्रवास करतायत. याहूनही गंभीर बाब म्हणजे महिला जेथून हा प्रवास करतायत तेथे खाली नदीचे पाणी वाहत आहे. या खळखळणाऱ्या पाण्यात जर कोणी घासरून पडलं तर त्या व्यक्तीचा जीव तिथेच गेला असं समजा.

मात्र तरीही या महिला आपली आणि आपल्या कुटुंबाची तहान भागवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. त्यांच्या संघर्षाचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. शहरात ज्या ठिकाणी मुबलक पाणी आहे तेथील अनेक व्यक्ती विनाकारण पाणी वाया घालवतात.

पिण्यासाठी ग्लास भरून पाणी घेतात त्यातलं आर्ध पितात आणि बाकीचं फेकून देतात. अनेकदा पाण्याचे नळ वापर झाल्यावर बंद करत नाहीत. अशा व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे. कारण जेथे पाणी नाही तेथील नागरिक जीवाची पर्वा न करता पाण्याच्या शोधात फिरत असतात. @_sudha_murthy_team या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

MLC Election : परभणी-हिंगोलीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला, श्रीकांत शिंदेंच्या विश्वासूला संधी; नेमकं गणित काय?

SCROLL FOR NEXT