Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Aunty Vs Cobra: अंगणात भला मोठा साप पाहिल्यानंतर मावशीचं रौद्र अवतार, जमिनीवर दांडक्यानं ठोकला ताल, अन्..

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक अंगाचा थरकाप उडवाणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात घराच्या बाहेर भलामोठा साप आढळून आलेला आहे. पुढे काय घडते या घटनेत ते पहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातही जास्तीत जास्त व्हिडिओहे भल्या मोठ्या सापांचे असतात. कधी हे साप घरातील बेडरुममध्ये आढळतात तर कधी अथंरुणात. सध्या अशात एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क घराच्या बाहेर एक भलामोठा कोब्रा साप दिसून आलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक कॉलनी दिसत आहे. मात्र जर तुम्ही नीट पाहिले तर चक्क एक भलामोठा कोब्रा साप एका घराबाहेर आलेला दिसत आहे. सापाला पाहून एक महिला एका काठीने त्याला लांब जाण्यास सांगत आहे,मात्र साप(Snake) पुढे पुढे जात आहे. काही वेळाने दुसऱ्या घरातील अजून एक महिला बाहेर येते आणि काठीने सापाला दुसरीकडे जाण्यास सांगत असते. संपूर्ण घटना तेथिल एका तरुणीने मोबाईलमध्ये कैद केली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''gharkekalesh2'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. घडलेला सर्व प्रकार कुठल्या शहरातील आहे हे आणि कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र दोन दिवसापूर्वीच इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर झालेला असून असंख्य लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे.

एवढेच नाही तर इन्स्टाग्रामवर नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'''काय होईल सांगता येत नाही'' तर अशा प्रकारे अनेकांनी हैराणजनक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

SCROLL FOR NEXT