Cobra Bite Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महिलेला सापाचा दंश, गावकऱ्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी भोंदूबाबाकडं नेलं; पुढं जे घडलं ते भयंकर, पाहा VIDEO

Cobra Bite Video: बिहारमधील एका महिलेला कोब्रा साप चावल्यानंतर रुग्णालयात न नेता गावकऱ्यांनी भोंदूबाबाकडे नेले. महिलेवर अंधश्रद्धेचे विधी करण्यात आले.

Manasvi Choudhary

कोब्रा हे नाव जरी ऐकलं तरी अंगाला शहारे येतात. कोब्रा विषारी साप आहे. कोब्रा सापाने दंश केल्यानंतर व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. कोब्रा सापाने दंश केल्यानंतर वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे आहे. बिहारमध्ये एका महिलेला कोब्रा सापाने दंश केल्यानंतर तिला रूग्णालयात न नेता भोंदूबाबाकडे नेले आहे. याचदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिहारमधील सीतामढी येथील एका महिलेला कोब्रा सापाने दंश केला आहे. यावेळी तेथील गावकऱ्यांनी या महिलेला रूग्णालयात नाही तर भोंदूबाबाकडे घेऊन गेले आहेत. महिलेच्या शरीरात विष पसरू नये म्हणून भोंदूबाबाकडे नेलं आहे. गावकऱ्यांचा भोंदूबाबांवर विश्वास आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला जमिनीवर झोपलेली दिसत आहे तिच्या आजबाजूला लोक जमले आहेत. ते भूत विधी करताना दिसत आहेत. त्यातील एक पुरूष तिला म्हणजेच तिच्याबाजूच्या सापाला काठीने मार्गदर्शन करताना दिसत आहे. साप तिच्या शरीरातून विष परत शोषून घेईल असा प्रयोग ते करत आहेत.

कोब्रा सापाने दंश केल्यानंतर काय करावे?

जर एखाद्या व्यक्तीला कोब्रा सापाने दंश केल्यानंतर घाबरू जाऊ नये. वेळीच योग्य उपचार करावा. विष शरीरात लवकर पसरू नये म्हणून व्यक्तीला शांत ठेवावे. हालचाल करू नये. साप चावल्यानंतर वैद्यकीय सल्ला घ्या. ज्या ठिकाणी साप चावला आहे तो भाग साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवा. नंतर तो भाग स्वच्छ कापडाने झाकून टाका. साप चावल्यावर त्या जखमेवर कधीही बर्फ लावू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT